स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची आक्रमक भूमिका
येवला प्नतिनिधी येथील मुक्तीभुमी बांधकामाचा टप्पा १ व २ कामाचे ऑडिट थर्ड पार्टी निःपक्ष संस्थेकडून सामाजिक न्याय विभागामार्फत करा व भ्रष्ट आधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करा अन्यथा समविचारी पक्षांना बरोबर घेऊन जन आंदोलन छेडणार असा इशारा स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे यांनी दिल्याने भ्रष्ट अधिकाऱ्यांची धांदल उडाली आहे.
आज येवला शहरातील विंचूर चौफुलीवरील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर लक्षवेधी जाहीर निदर्शने पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळेस भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनास सुरवात झाली.
अतिशय जोरदार घोषणा बाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता शिवराय फुले शाहु आंबेडकर यांच्या नावाने जयजयकार करीत घोषणा देण्यात आल्या तसेच मुक्तीभुमी आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची,आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा,भ्रष्ट आधिकारी आमच्यावर गुन्हे दाखल करा अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या यावेळेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विजय घोडेराव कार्याध्यक्ष बाळासाहेब आहिरे उपाध्यक्ष विनोद त्रिभुवन महीला आघाडी तालुकाध्यक्ष आशा आहेर यांची ही भाषणे झाली.
प्रसंगी नायब तहसीलदार पंकज नेमसे सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री.गायकवाड पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी निवेदन स्विकारले व निवेदन वरिष्ठांकडे तातडीने पाठवून खुलासा करतो असे आश्वासन नायब तहसीलदार पंकज नेमसे यांनी यावेळी आंदोलकांना दिले
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने यापूर्वी तहसीलदार येवला व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना लेखी निवेदन सादर केले होते परंतु लेखी स्वरूपात कुठलीच माहिती किंवा कारवाई झालेली नसल्याने आंदोलकांची निराशा झाली आज देखील आंदोलकांची मागणी आहे कि जर टप्पा क्रमांक २ ला अंदाजे १५ कोटी रुपये मंजुर होते तिथे दोन तोरण गेट व संरक्षण भिंतमजुंर असताना तारेचे कुंपण का?केले या कडे शासकीय आधिकारी यांनी लक्ष न देता डोळेझाक का? केली या अनागोंदी आंदोलक त्रस्त झाले आहे. सदरच्या जागेची मोजणी झालेली असताना अतिक्रमण का? हटवले नाही जर काम अपूर्ण होते तर लोकार्पण कसे झाले या सर्व गोष्टी लक्षात घेता त्या ठिकाणी खुप मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते आहे
म्हणून आंदोलकांची मागणी आहे मंजुरी प्रमाणे संरक्षण भिंत व तोरण गेट उभारा व ज्या अधिकाऱ्यांनी तारेचे कुंपण केले त्यांच्याकडून तो शासनाचा खर्च वसूल करून त्यांच्या वर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा यात समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांचे देखील खातेनिहाय चौकशी करण्यात यावी कारण मुबलक निधी उपलब्ध असताना ते बेपर्वाही का? केली हा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.
उद्घाटनाच्या वेळेस बार्टीचे वरिष्ठ आधिकारी उपस्थित होते तर त्यांनी अपूर्ण काम असून लक्ष का दिले नाही? हा प्रश्न उपस्थितांना पडला होता याबाबत त्यांची सुद्धा चौकशी होणे तितकेच गरजेचे आहे तसेच येवल्याचे तहसीलदार हे मुक्तीभुमी स्मारक समितीचे सदस्य असून देखील त्यांनी जाणूनबुजून सदरच्या कामाकडे दुर्लक्ष केले ?मुक्तीभुमी टप्पा क्रमांक १ व २ कामाचे ऑडिट थर्ड पार्टी निःपक्ष संस्थेकडून सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात यावे आणि या सर्व झालेल्या गैरव्यवहारात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज शहरातील विंचूर चौफुलीवरील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर लक्ष वेधी जाहीर धरणे आंदोलन करण्यात आले.जर आमच्या आंदोलनांची वेळीच दखल घेतली नाही तर पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महेंद्र पगारे यांनी प्रशासनाला दिला
या निवेदनावर पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे तालुकाध्यक्ष विजय घोडेराव कार्याध्यक्ष बाळासाहेब आहीरे उपाध्यक्ष विनोद त्रिभुवन उपाध्यक्ष विधाता आहिरे समाधान गुंजाळ दादासाहेब मोरे मयुर सोनवणे विजय पगारे सुरेश खळे रजनीकांत काळे वंसत घोडेराव गौतम पगारे नवनाथ पगारे गणेश झाल्टे अतुल धिवर अजय धिवर राजेंद्र आहेर क्षानेश्वर शिर्के मनोहर पवार प्रमोद रणधीर राजेंद्र पगारे रोहीदास मोरे संतोष आहिरे महीला तालुकाध्यक्ष सौ.आशा आहेर उपाध्यक्ष नयना सोनवणे सौ.सुंनदा काळे सौ.ज्योती पगारे सौ.अलका घोडेराव सौ.नंदिनी पगारे सौ.सविता पवार सौ.उषा पगारे सौ.संगीता रणधीर सौ.पार्बताबाई पगारे सौ.अंजली रणधीर याच्यासह शेकडो महीला व पुरुष मोठ्या संखेने उपस्थित होते.