नाशिक दिनकर गायकवाड- शहर परिसरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये तीन मोटार सायकली अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या प्रकरणी वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वाहन चोरीचा पहिला प्रकार एम. जी.रोड येथे घडला. फिर्यादी कुणाल विश्वास सिनकर (रा. टकलेनगर, पंचवटी) यांनी दि. ६ जुलै रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास एम. जी. रोड वरील डेअरी डॉन समोर एमएच १५ जीटी २१९१ या क्रमांकाची ६० हजार रुपयांची होंडा युनिकॉन मोटार सायकल उभी केली होती. ही मोटार सायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार बागूल करीत आहेत.
वाहनचोरीचा दुसरा प्रकार मुंबई नाका येथे घडला. फिर्यादी प्रमोद सुकदेव पवार (रा. ठक्कर एनक्लेव्ह अपार्टमेंट, मुंबई नाका) यांनी बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये एमएच ०२ एफएस ३५८२ या क्रमांकाची ३५ हजार रुपयांची सुझुकी ॲक्सेस मोपेड पार्क केली होती. ही मोपेड अज्ञात चोरट्याने भरदुपारी चोरून नेली.या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात वाहनचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत पुढील तपास पोलीस हवालदार गोडे करीत आहेत.
वाहनचोरीचा तिसरा प्रकार सिडकोत घडला. फिर्यादी गोकुळ अशोक पारधी (रा. दत्त चौक, सिडको, नाशिक) यांनी घराजवळच एमएच १९ बीजे ५९७० या क्रमांकाची ४० हजार रुपये किमतीची हिरोहोंडा स्प्लेंडर भा मोटारसायकल उभी केली होती. ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार संगम करीत आहेत.