मुंबई सिटीलाईन न्युज नेटवर्क मुंबईतील आझाद मैदान येथे जनसुरक्षा विधेयकाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनकर्त्यांना दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे नुकतेच शिवसेना पक्षप्रमुख .उद्धव ठाकरे ह्यांनी आंदोलनकर्त्यां सोबत संवाद साधला.
ही एकजूट कायम ठेवा आणि जर का? पाशवी बहुमताने सरकारने हे विधेयक मंजूर केलं तर त्याविरोधात लढायची ताकद ठेवा, असा आशावाद देखील ह्यावेळी त्यांनी व्यक्त केला.
ह्यावेळी युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते,आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, विधानपरिषद विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव तसेच शिवसेना नेते, आमदार उपस्थित होते.
