मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाशी संबंधित असलेल्या विविध जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीनी केलेल्या मागणीनुसार प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी बैठक आयोजित करून संबंधिताना तातडीने यावर मार्ग काढण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
बैठकीसाठी मंत्री शंभूराज देसाई, मकरंद पाटील, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव. दीपक कपूर, आमदार सुभाषबापू देशमुख, आमदार. अमल महाडिक, माजी मंत्री. शिवाजीराव नाईक, जलसंपदा विभागाचे सचिव डॉ.संजय बेलसरे यांच्यासह सांगली, साताराजिल्ह्यातील अधिकारी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक . हनुमंत गुणाले व जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
