स्व.भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

Cityline Media
0
नागपूर सिटीलाईन न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथील 'स्व.भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर'चे उदघाटन.यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, आमदार डॉ. आशिष देशमुख, श्रीमती कांचन गडकरी, व इतर मान्यवर उपस्थित होते.
‘स्व.भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर’मुळे गरीब रुग्णांना मिळणार अत्यल्प दरात आरोग्य सेवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच नागपूरातील 'स्व.भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर'चे उदघाटन पार पडले.

याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, स्व. भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर हे देशातील पहिले असे सेंटर आहे, ज्यामधील सर्व वैद्यकीय तपासणी उपकरणे देशातच तयार करण्यात आली आहेत. हे सेंटर ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनांचे प्रतीक आहे.विशेष म्हणजे, येथे वापरण्यात येणाऱ्या तपासणी उपकरणांच्या किंमती कमी असल्यामुळे सेवा अत्यल्प दरात उपलब्ध होणार आहेत. ज्यामुळे गरजू रुग्णांना या सुविधेचा लाभ घेता येईल.

गरजूंसाठी 'स्व. भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर' उभारल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि श्रीमती कांचन गडकरी यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनापासून आभार मानले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'सिकलसेल आणि थॅलेसेमिया' यासारख्या दुर्धर आजारांवर प्रभावी उपचारासाठी योजना तयार केली जाईल आणि रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी नियोजन केले जाईल, असेही आश्वस्त केले.समाजसेवेची प्रेरणा आणि सेवाभावी कार्याचा वारसा

स्व. भानुताई गडकरी यांनी आपल्या जीवनकाळात समाजासाठी सकारात्मक कार्य केले. त्यांच्या कार्याची प्रेरणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मिळाली. त्यांच्या संस्कारांमुळेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विविध क्षेत्रांत योगदान देत देशाचे प्रतिनिधित्व केले. समाजातील शेवटच्या व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून मागासवर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. एक यशस्वी मंत्री म्हणून त्यांनी राज्य व देशाच्या विकासासाठी योगदान दिले. विविध उपक्रमांद्वारे गरिबांपर्यंत उत्तम आरोग्य सेवा पोहोचवण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. या दृष्टीने हे डायग्नोस्टिक सेंटर महत्त्वाचे ठरेल.
 
सर्वसामान्य नागरिकांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सध्या राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात ही केंद्रे कार्यरत आहेत आणि गरजूंना मदत पुरवली जात आहे. यासोबतच धर्मादाय रुग्णालयांमार्फत सेवा देण्यासाठी धर्मादाय कक्षही सुरू करण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार कृष्णा खोपडे,आमदार संदीप जोशी,आमदार प्रवीण दटके, आमदार डॉ.आशिष देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!