नेवासा प्नतिनिधी तालुक्यातील कुकणा येथील चौधरी चाळ ते कुंकाणा रस्ता पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचा लोकार्पण सोहळा पार पडला आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांच्या या लोकार्पण सोहळ्यासाठी येथील ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती होती.
कुकाणा येथे पार पडलेल्या या.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आमदार पांडुरंग अभंग, यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते, आमदार विठ्ठलराव लंघे संचालक काशिनाथ आण्णा नवले,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा,राष्ट्रवादीचे युवा नेते अब्दुल शेख,
शिवसेना नेते रामदास गोल्हार, भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुश काळे,शिवसेना तालुका अध्यक्ष संजय पवार, सरपंच लता अभंग, उपसरपंच सोमनाथ कचरे, अशोक शेठ चौधरी,सौ.लीलाबाई अशोक चौधरी, डॉ.सपना कुलदीप पवार,मा. सरपंच एकनाथ कावरे,
अमोल अभंग,भैय्यासाहेब देशमुख, विलास देशमुख,अनिल गर्जे, सरपंच विनोद ढोकणे, डॉ.बाळासाहेब कोलते, सरपंच अंकुश धंदक, युवा नेते किरण शिंदे, वसंत गरड, सुभाष शेठ भंडारी, दत्तू नाना पोटे, नवनाथ साळुंके, बबनराव पिसोटे, मच्छिंद्र कावरे, शिवाजी मते, शंकर भारस्कर आदी मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.