शांतीनगरच्या वैजयंती अपार्टमेंट मध्ये भानामती करून भिती पसरविण्याचा खोडसाळपणा

Cityline Media
0
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केले नागरिकांचे प्रबोधन

नाशिक दिनकर गायकवाड शांतीनगरला एका सोसायटीत रात्रीच्या वेळी बंद दरवाजा समोर भानामती,करणी असे अंधश्रद्धा युक्त प्रकार करून रहिवाशांमध्ये भीती पसरविण्याच्या हेतूने स्मशानभूमीतून अस्थी व राख आणून टाकल्याचा प्रकार घडला.
याबाबत घरमालकाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ.ठकसेन गोराने यांना तत्काळ संपर्क साधून माहिती दिली असता कार्यकत्यांनी तत्काळ पोलिसांसह घटनास्थळाला भेट देत प्रबोधन करून रहिवाशांच्या मनातील अंधश्रद्धेतून निर्माण झालेली भीती दूर करण्याचा प्रयत्न केला.

शांतीनगर येथील वैजयंती अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर दरवाजाबाहेर रात्रीच्यावेळी भानामती, करणी करण्याचा बहाणा करून, भीती पसरविण्याच्या खोडसाळपणा अज्ञात व्यक्तीने केल्याचे दिसून आले. यावेळी या ठिकाणी स्मशानभूमीतून राख व अस्थी आणून रात्रीच्या वेळी बंद दरवाजापुढे अज्ञात व्यक्तीने पसरविल्याचे सकाळी घरमालक महिलेला दिसून आले. त्यांनी तत्काळ अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गौराणे यांना तत्काळ कळविली. डॉ गोराणे यांनी शहर कार्याध्यक्ष कोमल वर्दे यांच्यामार्फत म्हसरूळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामणी व उपनिरीक्षक मनोहर क्षीरसागर यांच्याशी याबाबत संपर्क साधला. त्यांनी पोलीस हवालदार संतोष सुपेकर, विनायक तांदळे यांना अंनिसच्या कार्यकर्त्यांसोबत घटनास्थळी पाठवले. यावेळी या इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराला

रात्री कुलूप लावलेले असतानाही हा प्रकार घडला.म्हणजे इमारतीत राहणाऱ्या व्यक्तीनेच हा प्रकार केला असल्याचे तेथील रहिवाशांनी कार्यकत्यांना सांगितले.अंनिसचे डॉ.ठकसेन गोराणे,नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. आशा लांडगे, जिल्हा बुवाबाजी विरोधी संघर्ष सचिव महेंद्र दातरंगे, राज्य सदस्य प्रल्हाद मिस्त्री,रहिवाशांचे प्रबोधन केले. दरम्यान अंनिसच्या प्रबोधनानंतर घरमालक महिलेने स्वतः पुढाकार घेऊन दारा पुढील अस्थी व राख स्वतः जमा करून एका पिशवीत भरली. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विचार व कार्यपद्धतीची थोडक्यात माहिती प्रल्हाद मिरवी यांनी उपस्थित रहिवाशांना दिली.जादूटोणा विरोधी कायद्याची माहिती देत, कोणी व्यक्ती जर जादूटोणा करण्याच्या नावाखाली लोकांमध्ये दहशत,भीती आणि अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न करीत असेल आणि शोषण करीत असेल तर गुन्हा सिद्ध झाल्यास त्या व्यक्तीला सहा महिने ते सात वर्षांची कारावासाची शिक्षा व पाच हजार रुपये ते पन्नास हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद कायद्यात असल्याचे डॉ. गोराणे यांनी सांगितले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!