नाशिक प्रतिनिधी महानगरपालिकेंतर्गत मौजे देवळाली येथील सर्व्हे क्रमांक २९५ या आरक्षित क्षेत्राच्या मोबदल्यात देण्यात आलेल्या हस्तांतरणीय विकास हक्क संदर्भात आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक आणि जिल्हाधिकारी, नाशिक यांनी सखोल चौकशी करून १५ दिवसात अहवाल सादर करावा,असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी विधानभवन येथे झालेल्या बैठकीत दिले.बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे अतिरिक्त जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे,सहायक पोलीस आयुक्त,सचिन बारी, पोलीस उप आयुक्त मोनिका राऊत उपस्थित होते.तर नगररचना संचालिका डॉ.प्रतिभा भदाणे, सुलेखा वैजापूरकर, सह संचालक धनंजय खोत, उपसंचालक दिपक वराडे उपस्थित होते.
3/related/default
