संगमनेर संजय गायकवाड आषाढी एकादशी निमित्त संगमनेर महायुतीच्या वतीने रविवार दिनांक ६ जुलै २०२५ सायंकाळी६ वाजता बोलावा विठ्ठल या भक्ती गीताचे मैफल धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महायुतीच्या सुत्रांकडून मिळाली आहे.
संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्स या ठिकाणी यावर्षी प्रथमच आमदार अमोल खताळ पाटील यांच्या मार्गदर्शना खाली सुप्रसिद्ध गायक पराग पांडव आणि सुरभी कुलकर्णी हे बोलावा विठ्ठल हा बहारदार भक्ती गीते गाणार आहेत.
या मैफलीत की बोर्ड संगत नरेंद्र साळवे ,संगीत संयोजक सत्यजित सराफ,तबला वादक सिद्धार्थ थत्ते ,पखवाज वादक वैभव पवार, टाळ वादक प्रथमेश बिडवे या कलाकारांची साथ मिळणार आहे तरी या भक्तीगीत मैफलीला संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संगमनेर महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.
