श्रीरामपूर दिपक कदम श्रीरामपूर नगर परिषद,प्रेस क्लब (श्रीरामपूर) व वसुंधरा वृक्षसंवर्धन समितीच्या वतीने पत्रकार भवन परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले.
वृक्षारोपण कार्यक्रमासाठी मा.नगराध्यक्ष अनुराधा आदिक, मा.उपनगराध्यक्ष करण ससाणे, प्रेस क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब भांड,श्रीरामपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक गाडेकर, पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोजकुमार आगे,नगर पालिकेचे अभियंता ॲड प्रमोद चव्हाण,
ज्येष्ठ पत्रकार प्रदीप आहेर,राजेंद्र बोरसे,मधुकर माळवे, स्वामीराज कुलथे, बद्री वढणे,राजेंद्र दळवी,संतोष डगले, वृक्ष संवर्धन समितीच्या अध्यक्ष अनिता डंबीर,
मा.नगरसेविका अर्चना पानसरे, दळवी,खटोड,गांधी यांच्यासह महिला सदस्य उपस्थित होत्या. या उपक्रमाला मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी शुभेच्छा दिल्या असून श्रीरामपूर शहरात वृक्षारोपण करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, प्रत्येक नागरिकांनी आपापल्या घरासमोर किमान एक तरी झाड लावावे,असे आवाहन यावेळी त्यांनी केले.