ख्रिश्चन धर्मांतर करणाऱ्या अनुसूचित जातीच्या लोकांना यापुढे आरक्षणाचा लाभ मिळणार नाही.

Cityline Media
0
-आभासी ख्रिस्ती आरक्षणापासून वंचित राहणार
-मुख्यमंत्री फडणवीसांची विधानपरिषदेत माहिती

मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क महाराष्ट्रात आभासी ख्रिश्चन लोकांकडून धर्म स्वातंत्र्याचा दुरुपयोग सुरू असून हिंदू धर्मातील अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील लोकांना गुप्तपणे ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडले जात आहे.अशा लोकांकडून या धर्माच्या प्रथा,परंपरा आणि प्रार्थना पद्धती छुप्या पद्धतीने पाळल्या जात आहेत. अंत्यविधीही ख्रिश्चन पद्धतीने होत असून त्यावेळी त्यांचा खरा धर्म दिसून येत आहे.या लोकांनी अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ घेत नोकरी पटकावली असून निवडणूकही लढवली आहे.
राज्यातील नंदुरबार, सांगली आणि अहिल्यानगर जिल्ह्यात असे प्रकरणे समोर आली असल्याचा मुद्दा भाजपाचे आमदार अमित गोरखे यांनी लक्षवेधीद्वारे उपस्थित केला होता. या लक्षवेधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, २६ नोव्हेंबर २०२४ ला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार अनुसूचित जातीचे आरक्षण हे केवळ हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मीयच घेऊ शकतात. इतर धर्मीय ते आरक्षण घेऊ शकत नाहीत,अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांनीही यावर प्रश्न विचारला. त्या म्हणाल्या, सांगली जिल्ह्यातील कुपवाड तालुक्याच्या एका उच्चशिक्षित घरातील मुलीची आभासी ख्रिश्चन गटातील मुलाकडून तिची फसवणूक करण्यात आली आहे.खोटे सांगून लग्न केल्यानंतर मुलाचे कुटुंब ख्रिश्चन असल्याचे समजले.लग्नानंतर मुलीचा छळ करण्यात आला. या छळामुळे सात महिन्यांच्या गर्भवती मुलीला आपला जीव गमवावा लागला.धर्मांतराचा कायदा कधीपर्यंत अंमलांत येणार? असा प्रश्न चित्रा वाघ यांनी विचारला.

यापैकी इतर धर्मातील लोकांना आरक्षण घेण्याचा अधिकार राहणार नाही.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने जर इतर धर्मीयांनी अनुसूचित जातीचे आरक्षण घेतले असेल तर त्यांचे जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!