नागपूर सिटीलाईन न्यूज नेटवर्क जिल्ह्यात कामठी येथे ओगावा सोसायटीने ड्रॅगन पॅलेस परिसरातील जागेची उपयोगिता बदलून पर्यटकांची निवास व्यवस्था करण्याबाबत प्रस्ताव सादर केला आहे.
यासाठी सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक आयुक्त आणि ओगावा संस्था ही कार्यान्वयन यंत्रणा असेल. संस्थेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे काम करावे, अशी सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
ओगावा संस्थेच्या नवीन बांधकाम प्रस्तावाबाबत मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
