बारामती सिटीलाईन न्यूज नेटवर्क महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजित पवार यांनी नुकतीच बारामती येथील प्रांत आणि तहसीलदार निवासस्थानाचं बांधकाम, साठवण तलाव (लेक फ्रंट पार्क येथील पादचारी पुलाचं रेलिंग, फाऊंटन डिझाईन, विव्हिंग डेक अंतिम करणं) तसंच उर्दू शाळा (बांधकाम प्लींथ अंतिम करणं) आदी विकासकामांची पाहणी केली.
यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी कामांशी संबंधित अधिकाऱ्यांना काही महत्त्वपूर्ण सूचना देखील केल्या लवकरच या कामांचे लोकार्पण होणार असल्याचे कळते