नाशिक दिनकर गायकवाड घराजवळ उभ्या असलेल्या शिक्षिकेच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची पोत मोटारसायकलीवरून आलेल्या अनोळखी इसमाने बळजबरीने खेचून नेल्याची घटना इंदिरानगर येथे घडली.
फिर्यादी सरिता सत्यनाथन नायर (रा. तुळसीराधे रो-हाऊस, माऊलीनगर, इंदिरानगर) या शिक्षिका असून, त्या दि. ९ जुलै रोजी रात्री ८ च्या सुमारास घराच्या समोर उभ्या होत्या. त्यावेळी पाठीमागून मोटारसायकलीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने नायर यांच्या खांद्याला धक्का देऊन त्यांच्या
गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची १७ ग्रॅमची सोन्याची पोत खेचून टोयोटा शोरूमकडे पळून गेले, तसेच फिर्यादीला धक्का दिल्याने त्या खाली पडून जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.