नाशिक दिनकर गायकवाड बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याची चेन लंपास केल्याची घटना ठक्कर बझार येथे घडली.
फिर्यादी बेबीबाई मधुकर राऊत व त्यांचे पती (दोघे रा. वणी, ता. दिंडोरी) हे ठक्कर बझार येथे गावी जाण्यासाठी आले होते. हे दाम्पत्य नाशिक ते धुळे बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन कोणी तरी अज्ञात इसमाने राऊत यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची ४५ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन चोरून नेली. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.