बच्चू कडूनीं उपस्थित केलेल्या अनेक विषयावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ‌ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

Cityline Media
0
मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क विधानभवन येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मा.राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपस्थित केलेल्या विविध विषयांवर नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली.
 शेतकरी, शेतमजूर,दिव्यांग, मच्छिमार व मेंढपाळांच्या समस्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल,असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे,कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे, पणन मंत्री जयकुमार रावल, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, वने मंत्री गणेश नाईक, कामगार मंत्री आकाश फुंडकर,मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील उपस्थित होते. तसेच दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते.याबरोबरच संबंधित विभागाचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!