पंढरपूर सिटीलाईन न्यूज नेटवर्क आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे उपमुख्यमंत्री. एकनाथ शिंदे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि आरोग्यमंत्री. प्रकाशजी आबिटकर यांनी पंढरपूर शहराला भेट दिली. यादरम्यान उपमुख्यमंत्री. एकनाथ शिंदे यांच्या समवेत बुलेट वरून पंढरपूर शहराचा फेरफटका मारला.
यावेळी त्यांनी वारकऱ्यांच्या आरोग्याच्या, सुरक्षेच्या तसेच सेवा-सुविधांच्या दृष्टिकोनातून सुरू असलेल्या उपाययोजनांचा प्रत्यक्ष पाहणी करत सविस्तर आढावा घेतला. यावेळी शहरातील ६५ एकर परिसर, चंद्रभागा नदी वाळवंट आणि गोपाळपूर पत्रा शेड परिसराची पाहणी करत, प्रशासनामार्फत वारकरी मंडळींसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या सर्व सोयी-सुविधांचा आढावा घेतला.
यावेळी दर्शन रांगांची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, स्वच्छतागृहे, निवारा शिबिरे, वाहतूक नियंत्रण आणि आपत्कालीन सेवांची तयारी यांचा सविस्तर आढावा घेतला.तसेच, विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत आवश्यक सूचना दिल्या.
वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी शासन व प्रशासन सज्ज असून, यंदाची वारी अधिक सुलभ, सुरक्षित आणि आरोग्यदायी व्हावी, या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
