लातूर सिटीलाईन न्यूज नेटवर्क लातूर जिल्ह्यातील शासन निर्णयानुसार महसूल व पोलीस विभागाने जप्त केलेली रेती हे घरकुल लाभार्थ्यांना विनामूल्य देण्याचा राज्य सरकारने निर्णय केला असून,नुकतेच तहसील कार्यालय अहमदपूर येथे प्रतिनिधिक स्वरूपात सात लाभार्थ्यांना मोफत रेती वाटपचे आदेश वितरित करण्यात आले.
यावेळी उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे,तहसीलदार उज्वला पांगरकर,उपविभागीय अधिकारी पोलीस अरविंद रायभोळे, गटविकास अधिकारी प्रकज शेळके, पोलीस निरीक्षक बिरप्पा भूसनूर,अधीक्षक डॉ. नागरगोजे, प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेंगणे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, किशोर बापू मुंडे, प्रशांत भोसले,दयानंद सुरवसे, डॉ.भालचंद्र चाटे,जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप सह विविध मान्यवर प्रशासकीय अधिकारी व लाभार्थी उपस्थित होते.
