नांदूर मानूर शाळेस अचानक शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट

Cityline Media
0
नाशिक प्रतिनिधी येथील नाशिक महानगरपालिका संचलित माध्यमिक विद्यालय नांदूर मानुर या शाळेस नुकतीच शिक्षण मंत्री दादा भुसे अचानक भेट दिली.या भेटी दरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांशी त्यांनी थेट संवाद साधला.विद्यार्थ्यांचे नखे तपासले,वाचन क्षमता तपासण्यासाठी त्यांच्याकडून वाचन करून घेतले.
यावेळी इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना अजूनही स्पष्टपणे इंग्रजी वाचता येत नसल्याचे लक्षात येताच योग्य त्या उपाययोजना करून विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचन,लेखन आणि समज सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश संबंधित शिक्षकांना दिले. तसेच शाळेतील पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्याचे निर्देशही दिले.

यावेळी सांगितले की,सर्व शिक्षकांनी वेळेवर उपस्थित राहावे,प्रत्येक वर्गातील डिजिटल पॅनल सुरु ठेवावा व त्याचा नियमित वापर करावा,तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी वेळेवर नोंदवावी.शाळेचा संपूर्ण परिसर स्वच्छ व स्वच्छतायुक्त ठेवावा. 

“एक पेड माँ के नाम” या अभियानाचा संदर्भ देत सांगितले की,प्रत्येक शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळेत,घराजवळ एक झाड लावावे व त्याची जबाबदारीने देखभाल करावी.दररोज प्रार्थनेत राष्ट्रगीतासोबत राज्यगीतही गायले जावे,विद्यार्थ्यांच्या भाषा व गणित विषयातील पायाभूत क्षमतांवर विशेष भर दिला जावा आणि सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होण्यासाठी नविन उपक्रम राबवावे अशा सूचना यावेळी केल्या.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!