कळवण-सुरगाणा उपजिल्हा रुग्णालयाच्या जागेला माझ्या पाठपुराव्यामुळे मंजुरी इतरांनी श्रेय लाटू नये-आमदार पवार

Cityline Media
0


नाशिक दिनकर गायकवाड -सुरगाणा उपजिल्हा रुग्णालयासाठी शासनाकडून पाच एकर शासकीय जागेची मंजुरी मिळाल्याबद्दल जिल्ह्यात समाधान व्यक्त होत असताना,या निर्णयाचे श्रेय घेण्यासाठी सुरू झालेल्या श्रेयवादाला तोंड फुटले आहे.
भाजपच्या माजी मंत्री डॉ.भारती पवार यांनी या मंजुरीचे श्रेय घेत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार पक्ष) आ. नितीन पवार यांनी स्पष्ट शब्दांत आक्षेप घेतला आहे, की ही मंजुरी ही माझ्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मिळाली असून, इतरांनी त्यावर फुकटचे श्रेय घेऊ नये.आ.नितीन पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की सुरगाणा उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेची मागणी मागील एक वर्षांपासून सुरू होती.गट नंबर २४/१ ही शासकीय जमीन आराखड्यातून निवडून, त्यासाठी तहसील कार्यालय,उपविभागीय कार्यालय (कळवण), जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, तसेच मंत्रालयातील महसूल विभाग या सर्व ठिकाणी पाठपुरावा केला गेला. मी स्वतःया फाईलचा सातत्याने पाठपुरावा करत होतो. या प्रक्रियेत अनेक अडचणी आल्या. विशेषतः ही जमीन सिलिंगखाली असल्याने ती विनामूल्य किंवा नाममात्र दराने देता येत नव्हती.महसूल विभागाने फेब्रुवारी २०२५ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांना नवीन सुधारित प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. तो प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला गेला व त्यानंतर महसूल विभाग, महसूलमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वारंवार भेटी घेऊन या फाईलला मंजुरी मिळवून दिली. 

दि. १६ जु २०२५ रोजी शासननिर्णय निर्गमित करण्यात आला. असून ५ एकर शासकीय जमीन उपजिल्हा रुग्णालयासाठी मंजूर करण्यात आली आहे. यामागे वर्षभराचा सातत्यपूर्ण प्रशासनिक व राजकीय पाठपुरावा असल्याचे आमदार नितीन पवार यांनी स्पष्ट केले.या प्रक्रियेत सहभाग नसलेल्यांनी आता फक्त प्रसिद्धीसाठी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला त्यांनी नाव न घेता माजी मंत्री डॉ.भारती पवार यांना लगावला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!