जास्त विज बिल येत असल्याने स्मार्ट मिटर विरोधात महाविकास आघाडी आक्रमक

Cityline Media
0
लासलगावला महावितरण कार्यालयावर मोर्चा

नाशिक दिनकर गायकवाड सध्या महाराष्ट्रात स्मार्ट मिटर बदलण्याचे काम महावितरण कडून सुरू आहे;मात्र सामान्य नागरिकांचा यास मोठ्या प्रमाणात विरोध आहे.ज्यांचे यापूर्वी मीटर बदलले, त्यांना वाढीव स्वरूपाचे बिल येत असल्याने नागरिकांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. या विरोधात महाविकास आघाडीतर्फे लासलगाव येथील महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा नेऊन सहाय्यक अभियंता यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी सचिन आत्माराम होळकर, शिवा पाटील-सुराशे, बाळासाहेब जगताप, सुरेश कुमावत, संतोष पानगव्हाणे, प्रमोद पाटील, संतोष वाघ, अमित बकरे, अमित गंभीरे, आशुतोष सूर्यवंशी, राहुल वाघ, सोहम रायते, महेश शिरसाट, सतीश पवार, बाळासाहेब महाराज शिरसाट, बालेश जाधव, सिद्ध होळकर, धनंजय होळकर, अनिल भागवत, संतोष पवार, नीलेश वडनेरे, विजय कुंदे, तसेच या स्मार्ट मीटरबाबतच्या आणि महावितरणच्या तक्रारी असणारे असंख्य ग्राहक आणि महाविकास आघाडीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना व मनसे या पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

महावितरणच्या बिलांबद्दल आणि स्मार्ट मीटरच्या विरोधातील अनेक तक्रारी तक्रारदारांनी याप्रसंगी
महावितरणकडून सध्या बसविले जाणारे स्मार्ट मीटर हे ऐच्छिक स्वरूपाचे आहे. हे सक्तीचे नाही, तसेच ते सक्तीचे नसल्याने मीटर बदलण्यापूर्वी ग्राहकाची लेखी परवानगी घेणे आवश्यक असल्याचे मत या प्रसंगी बोलताना काँग्रेस नेते सचिन होळकर यांनी व्यक्त केले.

 हे मीटर बसविणे हे तत्काळ थांबवणे आवश्यक आहे; अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना नेते शिवा सुरासे यांनी दिला आहे. योग्य तो बदल करण्याचे आश्वासन महावितरणचे सहाय्यक अभियंता अजय सावळे यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!