चणेगाव प्नतिनिधी संगमनेर तालुक्यातील चणेगाव येथील पुरातन श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर जिर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा समस्त ग्रामस्थ सहभागातून सोमवार ते बुधवार पार पडणार आहे.श्रावणी सोमवार औचित्य साधत नंदी ग्रामप्रदक्षीणा मिरवणूक आयोजन करत सोहळा शुभारंभ करण्यात आला होता.
डोळ्यांचे पारणे फेडत भव्य दिव्य मिरवणुकीत परीसरातील भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. मिरवणुक अग्रभागी पताकाधारी, कावडधारी,कलशधारी, पारंपरिक वाद्ये,भजनी मंडळ,नंदीरथ महिला पुरुष सहभागी झाले होते.मिरवणुक समारोपानंतर शाबुदाना खिचडी व केळी प्रसाद वितरण करण्यात आले.
