लातूर सिटीलाईन मिडिया नेटवर्क महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील वक्तव्य करणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विधानसभेत कामकाज चालू असताना ऑनलाइन रमी जुगार खेळत असल्याचे चित्र प्रसिद्ध झाले आहे.अशावेळी जनतेमध्ये प्रक्षोभनिर्माण होणे स्वभाविक आहे, लातूरमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे येथे आलेले असताना छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या अंगावर पत्त्याची पाणे फेकली मात्र राष्ट्रवादी काँग्रेस समर्थकांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली.
खरे!तर संतापलेल्या जनतेच्या प्रतिक्रियेची ही एक प्रतीकात्मक कृती होती,राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मात्र छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण केली आहे.सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन केलेली ही मारहाण निषेधार्यच आहे.ही घटना लातूरच्या संस्कृतीला शोभणारी तर अजिबात नाही. सत्ताधारी मंडळी कायदा हातात घेऊन आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना मारहाण करणार असतील तर ही बाब अत्यंत गंभीर आहे.
मारहाण करणाऱ्या या कार्यकर्त्यावर कडक कारवाई करून राज्यात किमान कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक आहे याचा पुरावा शासनाने द्यावा ही अपेक्षा आहे असे मत आमदार धीरज देशमुख यांनी व्यक्त केले.
