आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त ‌कोपरगात प्रशिक्षण सत्र उत्सवात

Cityline Media
0
कोपरगाव प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५, निमित्त सर्व सभासद व कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षण सत्राचे नुकतेच येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना सहजानंदनगर येथे,आयोजित करण्यात आले होते.
यावेळी, अध्यक्ष म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले,तसेच.गोपी गिलबिले,नासिक यांनी,संजीवनी उद्योग समूहातील विविध विभागांतील कर्मचाऱ्यांसाठी कामकाज या विषयावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले

२०२५ हे वर्ष "युनायटेड नेशन्स  –इंटरनॅशनल इयर ऑफ को-ऑपरेटिव्ह म्हणून साजरे केले जात आहे. या वर्षात जगभरातील सहकारी चळवळींच्या योगदानाला मान्यता देऊन, ‘सामूहिक प्रयत्नांद्वारे शाश्वत विकास’ या संकल्पनेचा पुनरुच्चार केला जातोय.
भारतात, जिथे सहकार हा ग्रामीण जीवनाचा भाग बनला आहे, तिथे या वर्षाचे महत्त्व अधिकच वाढते.

"आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष" आपल्याला ही संधी देते की आपण सहकाराच्या मूळ तत्वांकडे पुन्हा वळून पाहावं. भारतीय सहकार चळवळीने अनेक क्षेत्रांत यश मिळवलं आहे, मात्र आता ही चळवळ फक्त पारंपरिक चौकटीत न बसता, नवीन काळात डिजिटल, व्हावी लागेल.

सहकार ही केवळ शेतकऱ्यांसाठी नाही, ती भारताच्या समृद्ध आणि समतोल विकासाची गुरुकिल्ली आहे. या वर्षी आपण सर्वांनी "सहकारातून सक्षम भारत" घडवण्याचा संकल्प करायला हवा.

याप्रसंगी आमदार बिपिन कोल्हे उपाध्यक्ष.अध्यक्ष  राजेंद्र कोळपे, अमृत संजीवनीचे अध्यक्ष. पराग संधान, विश्वासराव महाले, ज्ञानेश्वर भगवंत परजणे,बाळासाहेब चंद्रभान वक्ते , ज्ञानदेव पाराजी औताडे ,रमेशद घोडेराव,  ज्ञानेश्वर चिलिया होन, त्र्यंबकराव  निवृत्ती सरोदे, सतीश सुभाषराव आव्हाड , बाळासाहेब पानगव्हाणे ,संजयराव औताडे, कार्यकारी संचालक  सुहास रघुनाथ यादव साहेब, दिवटे, कानवडे या प्रसंगी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!