श्रीरामपूर दिपक कदम अहिल्यानगर येथील यशवंत सेना व जय मल्हार शैक्षणिक आणि बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवसेना श्रीरामपूर तालुकाप्रमुख प्रदीप वाघ यांना नुकताच राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी वडाळा महादेव सोसायटीचे मा.अध्यक्ष राजेंद्र पवार शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख विशाल शिरसाठ शिवसेना संघटक दादासाहेब कोकणे श्रीरामपूर विधानसभा प्रमुख बाळासाहेब दौंड तालुका संघटक पप्पू महाराज गायकवाड शेतकरी सेनेचे
तालुका प्रमुख सदा मामा ऊंडे बांधकाम सेनेचे तालुकाप्रमुख बाबासाहेब भालेराव उप तालुका प्रमुख आबा बडाख महेश मोदी शरद डोळसे युवा सेनेचे उपतालुका प्रमुख हरी मुठे युवा कार्यकर्ते किशोर वाडीले व श्रीरामपूर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.