वरवंडी संपत भोसले संगमनेर तालुक्याच्या पठार भागात बिबट्यांनी आगेकूच केली असून त्यांच्या मुक्त संचाराने येथील जनता भयभीत झाली आहे भक्षासाठी फिरणाऱ्या बिबट्याने नुकतेच वरवंडी येथील दोन गायीवर हल्ला करून एकीला ठार केले तर दुसरी गंभीर जखमी झाली आहे.
सविस्तर वृत्त असे की येथील शेतकरी संपत केरु भोसले यांची गावालगत ओढ्याजवळ असलेल्या वस्तीवर त्यांनी दोन कालवडी गायी चरण्यासाठी वावरात बांधून ठेवल्या होत्या अचानक येथील माणसांची नजर चुकवून बिबट्याने त्या गायींवर हल्ला केला, गायीचे लचके तोडले त्यात एक गाय जागीच ठार झाली तर दुसरी गंभीर जखमी झाली.
संबंधित माहिती वनविभागाचे वनपाल श्री.गवळी यांना ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली त्यांनी तात्काळ दखल घेऊन त्या जागेवर पंचनामा करून येथील शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळेल असे आश्वासन दिले.बिबट्याच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत त्यांनी वनविभागाकडे पिंजरा लावुन बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी केली आहे.
