येवला मुक्ती भूमीवरील अतिक्रमण तात्काळ हटवा; अन्यथा आंदोलन

Cityline Media
0
तार कंपाऊंडचे काम बंद करून मजुंर असलेले संरक्षण भिंत व तोरण गेट उभारा-महेंद्र पगारे

येवला प्रतिनिधी मुक्तीभूमी देशभर प्रसिद्ध असलेल्या येवला येथे भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३५ साली बहिष्कृत वर्गाची सभा घेऊन धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा केली होती तेव्हापासून येवला मुक्तीभुमी या नावाने देशभरात ओळख निर्माण झाली दर वर्षी लाखो अनुयायी मुक्ती भुमीवर येत असतात व महामानवास विनम्र अभिवादन करतात.
मुक्तीभुमीचा विकास नागपुरच्या दिक्षा भूमी सारखा झाला पाहिजे म्हणून येवल्यातील आंबेडकरी चळवळीतील अनेक जेष्ठ नेत्यांनी  प्रयत्न करून तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री मा.चंद्रकांत हंडारे  व .छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने येवला मुक्तीभुमी भव्य दिव्य स्वरूपात दिसत आहे त्यात टप्पा क्रमांक १व टप्पा क्रमांक २ पूर्णत्वास येत आहे 
टप्पा क्रमांक दोनचे काम चालू केल्यानंतर जागेचे मोजमाप करण्यात आले होते व चोहोबाजूंनी संरक्षण भिंत मंजूर केले होते न्यायालयाच्या पाठीमागून जात असणारा बाह्यवळण रस्ता हा मुक्ती भुमीवरील जागेतून अतिक्रमित आहे‌.सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता उमेश पाटील  यांनी सदरच्या जागेचे मोजमाप केले त्यावेळेस स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते तिथेच होते सदरचा रस्ता हा त्याच्या मुळ जागेतून घेण्याचे ठरले होते परंतु अद्यापही तसे झालेच नाही 
सध्या मुक्ती भुमीवर संरक्षण भिंती ऐवजी तार कुपन लावण्याचे काम चालू आहे बाह्यवळण रस्त्याच्या बाजुने दोन तोरण गेट तयार होणार होते व ते मजुंरही होते परंतु ते न करता नुसते तार कंपाऊंड चालू करून लोकांची दिशाभूल चालू आहे उत्तर बाजुने संरक्षण भिंत असणे अतिशय गरजेचे आहे अतिक्रमण न हटविल्यामुळे  जवळपास १०×५५० फुट जागा मुक्ती भुमीची कमी झाली आहे 

टप्पा क्रमांक दोनसाठी जर अंदाजे १.५कोटी रूपये मंजूर करण्यात आले होते तर तोरण गेट व संरक्षण भिंती ऐवजी तारेचे  ‌कुपण का? असा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि अनागोंदी झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे

म्हणून आमची मागणी आहे कि उत्तर बाजूचे असणारे अतिक्रमण हे ताबडतोब हटवून तिथे तार कंपाऊंड न करता मजुंर असलेले  संरक्षण भिंतव तोरण गेट उभारण्यात यावे ही मुक्ती भुमीची ऐतिहासिक जागा असून देखील ज्या अधिकाऱ्याने हा फेरबदल केला त्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा व तार कंपाऊंड साठी केलला खर्च हा वसुल करून घ्यावा 

तहसीलदारांना दिलेल्या निवेदन पुढे म्हटले आहे की आपण मुक्तीभुमी स्मारकाच्या शासकीय कमिटीवर आहात म्हणून आपण ताबडतोब लक्ष घालून योग्य ती चौकशी करून मुक्तीभुमीच्या जागेवरील अतिक्रमण हटवून व संबधित बांधकाम विभागांच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून मंजुरी प्रमाणे संरक्षण भिंत व तोरण गेट तयार करण्याचे आदेश द्यावे व मला लेखी स्वरूपात आठ दिवसात कळविण्यात यावे अन्यथा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे यांनी नायब तहसीलदार पंकज नेवसे यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनावर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे तालुकाध्यक्ष विजय घोडेराव तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब आहिरे ता.उपाध्यक्ष विनोद त्रिभुवन सल्लागार सुरेश खळे युवा तालुकाध्यक्ष मयुर सोनवणे शहर उपाध्यक्षआकाश घोडेराव) जेष्ठ नेते दत्तू वाघ संघटक प्रशांत वाघ प्रवीण साबळे नितीन पगारे यादी पदाधिकाऱ्यांच्या निवेदनावर सह्या आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!