नाशिक दिनकर गायकवाड मराठा महासंघाच्या वतीने नाशिक शहरात 'मराठा जोडो संपर्क अभियान' या महत्वाकांक्षी उपक्रमाच्या प्रमुखपदी वैभव विठ्ठलराव वडजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वैभव वडजे यांना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर, शहराध्यक्ष संजय फडोळ, युवक जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष ॲड. गौरव गजरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र दिले आहे. वैभव वडजे यांनी 'ही संधी म्हणजे जबाबदारी असून, समाजहितासाठी आणि युवकांमध्ये एकतेसाठी झपाटून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.