पेठ तालुक्यात रस्त्यांची अक्षरशःचाळण

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड पेठ तालुक्यात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रस्त्यांची अक्षरशःचाळण झाली आहे.
यंत्रणेने केवळ डोळेझाक करत ग्रामीण भागातील समस्यांकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हा तीव्र रोष मनात ठेवून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना दररोज कसरत करत मार्गस्थ व्हावे लागते. विधानसभा व लोकसभा प्रचारा दरम्यान भरमसाट आश्वासनेही दिली जातात. आता तरी कायम स्वरूपी रस्ते दुरुस्तीसाठी प्रयत्न व्हावेत,अशी अपेक्षा स्थानिक ग्रामस्थ आणि इतर नागरिक वाहनधारकांनी व्यक्त केली आहे.

पेठ तालुका क्षेत्रफळाच्या दृष्टीने नाशिक जिल्ह्यात सर्वात लहान तालुका आहे. तालुक्याला लहान-मोठी खेडी आणि पाडे जोडली आहेत. यात ग्रामीण भागाला एकमेकांसाठी प्रत्येक गावाला जोडणारा रस्ता नादुरुस्त आहेत. ग्रामीण भागातील 'एखादा तरी गुळगुळीत रस्ता दाखवा आणि रोख रक्कम बक्षीस मिळवा' अशी उपरोधिक टीका देखील नागरिकांनी बोलताना व्यक्त केली.

करंजाळी ते कोहोर, पातळी ते करंजाळी, दाभाडी ते जुनोठी मार्गे पेठ या रस्त्यावर चारचाकीच काय दुचाकी चालविणे अवघड झाले आहे. दररोज खड्डे टाळण्यासाठी वाहनधारक गाडी विरुद्ध दिशेने गाडी चालवत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. आठवड्यात किमान दोन वेळा तरी दुचाकी घसरण्याच्या हमखास घटना घडतात. गत वर्षभरापासून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.

पावसाळ्यात तो रस्ता अजून खराब झाला आहे. हीच अवस्था तालुक्यातील अनेक खेडोपाडी रस्त्यांची झाली आहे. संबंधित विभागाने रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांसह वाहनधारकांनी केली आहे.

मलमपट्टी न करता कायमस्वरुपी उपाययोजना करा
- सावळघाट, कोटंबी घाट तसेच ग्रामीण मार्गावर्ती खड्डे पडले आहेत. त्यामुळे दैनिदिन अपघाताचे प्रमाण वाढतच आहे. वारंवार निवेदन देऊनही प्रशासन तात्पुरते माती, खड्डीने, खड्डे बुजवत आहे. त्याची कायमसूरूपी उपयोजना व्हावी.
गिरीष गावित, तालुकाध्यक्ष रा. कॉ. शरद पवार गट
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!