मखमलाबाद रागिणी जाधव नाशिक महानगर पालिकेच्या हद्दीत असलेल्या मखमलाबाद येथील नाग मंदिरात पंचक्रोशीतील श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी निमित्त मोठी जत्रा भरली होती यात्रेत अनेक ठिकाणी सर्व प्रकारचे दुकाने मिठाई हलवाई ज्वेलरी राहाट पाळणे असे अनेक दुकाने उभारण्यात आले होते यावेळी यात्रेतील उपस्थितांना नाशिक मनपाच्या घनकचरा विभागाकडून प्लास्टिक वापरावर बंदी आणि आरोग्याचे विविध प्रकारे महत्व जनतेला पटवून दिले.गावात जत्रेचे स्वरूप प्राप्त होते त्याचप्रमाणे नाग मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठे प्रमाणात गर्दी झाली होती यावेळी नाशिक इतर शहरातील खेड्यातील भाविक देखील यात्रेत तन्मयतेने सहभागी झाले होते यावेळी येथे नाशिक महानगरपालिकेच्या पंचवटी विभागाच्या घनकचरा व्यवस्थापन कडून मोठ्या प्रमाणात यात्रेतील भाविक आणि व्यवसायिक दुकानदारांना प्लास्टिक वापरावर बंदीसह अनेक विषयावर आणि कचऱ्यातील ओला कचरा,सुका कचरा याबाबत प्रबोधन करण्यात आले.
या विभागामार्फत आरोग्याच्या दृष्टीने सहकार्य लाभले जाते तसेच याही वर्षी नाशिक महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन यांच्याकडून जत्रेमध्ये व्यवसायिकांना व नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी कचरा करू नये प्लास्टिक वापर करू नये यासाठी घनकचरा व्यवस्थापन होतील अधिकारी कर्मचारी महिला कर्मचारी यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून स्वच्छतेविषयी जनजागृती केली आहे.
यासाठी पंचवटी विभागातील घनकचरा व्यवस्थापनातील एस आय डी एस आय कर्मचारी दिलीप चव्हाण जितेंद्र परमार संदीप,सुशील परमार,संदीप शिंदे अमित चव्हाण उल्हास पवार विश्वास जाधव विकास गोहिल सुनील बैसाणे शंकर बागुल धोंडू भाऊ गडगडे राजू नाना गांगुर्डे मनीषा बाबरिया कल्पना बागुल वनिता बेंडकुळे शिंदे मावशी दीपा चव्हाण मंदा मोरे या सर्व कर्मचारी सहभाग नोंदवला होता.