मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क जनविरोधी जनसुरक्षा कायदा रद्द करा या मागणीसाठी राज्यव्यापी जनआंदोलन सुरू असून त्याचा पुढचा टप्पा म्हणून १४ ऑगस्ट रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे डावे प्रागतिक पक्ष व संघटनांची जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समिती च्या वतीने राज्यव्यापी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.या परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित राहावे म्हणून समिती शिष्टमंडळाच्या वतीने त्यांना नुकतेच निमंत्रण देण्यात आले.
यावेळी भारताचा कम्युनिस्ट पक्ष माले लिबरेशनचे कॉ.उदय भट, कॉ.विजय कुलकर्णी,भारत जोडो अभियानच्या उल्का महाजन, भाकपचे राज्य सचिव कॉ.ॲड. सुभाष लांडे, कॉ. प्रकाश रेड्डी,कॉ.मिलिंद रानडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ.शैलेंद्र कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.