आश्वी संजय गायकवाड गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश तसेच शालेय साहित्ये देण्यासाठी राज्यात आणि देशात अनेक सेवाभावी सामाजिक संस्था तसेच दानशूर व्यक्ती समाजात कार्यरत असतात.आपणही या सेवाभावी कार्यात मदत करू शकतात जसे की गणवेश खरेदी करून किंवा आर्थिक मदत देऊन तसेच शालेय साहित्य देऊन गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मदत करत विद्यार्थ्यांना शिक्षणासारख्या मुख्य प्रवाहात आणत असतात आपणही सेवाभावी वृत्ती दाखवून विद्यार्थ्यांना मदत करू शकतो असे आआवाहन आश्वी इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य देवराम वडितके यांनी केले.
स्वर्गीय बच्चू जानकु सांगळे यांचे स्मरणार्थ तसेच कु.भूमिका जयदिप सांगळे हिच्या वाढदिवसानिमित्त जयदीप बच्चू सांगळे यांनी आश्वी इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय आश्वी बुद्रुक, येथील होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप केले.
यावेळी प्राचार्य देवराम वडितके,पर्यवेक्षक दिपक चव्हाण,पालक जयदिप सांगळे, रमेश थेटे,मोहन घिगे, सुवर्णा वाकचौरे, अनिता गाडे,राजेंद्र बर्डे, वैशाली सोसे,बी एस सहाणे,हरिभाऊ कोकाटे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष वैभव ताजणे यासह विद्यार्थी,पालक तसेच शिक्षकांची उपस्थिती होती.
शालेय गणवेशामुळे विद्यार्थ्यांमध्ये समानतेची भावना
-शालेय गणवेश विद्यार्थ्यांमध्ये समानतेची भावना निर्माण करतो. तसेच, शाळेत जाण्यासाठी एक आत्मविश्वास निर्माण होतो आणि शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळते. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना गणवेश,शालेय साहित्य मिळाल्यास, त्यांना शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि त्यांचे शिक्षण सुरू ठेवता येईल.
वैभव ताजणे, उपाध्यक्ष पालक शिक्षक समिती,आश्वी बुद्रुक
अतिरिक्त खर्चाला फाटा देत गरिब होतकरू विद्यार्थ्यांना मदत
स्वर्गीय बच्चू जानकु सांगळे यांचे स्मरणार्थ तसेच मुलगी भुमिका हिच्या वाढदिवसाच्या निमित्याने अतिरिक्त खर्चाला फाटा देत रयत शिक्षण संस्थेतील आश्वी इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय गरीब व होतकरू विद्यार्थींना मदत करत वाढदिवस साजरा केला.
जयदीप सांगळे,पालक
