आदर्श माता जयवंताबाई पावसे काळाच्या पडद्याआड

Cityline Media
0
संगमनेर नितीनचंद्र भालेराव तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील शेतकरी कुटुंबातील व वारकरी संप्रदायातील आदर्श माता  जयवंताबाई गंगाराम पावसे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
मृत्यू समयी त्यांचे वय वर्षे ९७ होते.
त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या.जयवंताबाई पावसे यांनी आयुष्यभर आपल्या काळा आईची शेतीची सेवा केली.
आपल्या उमेदीच्या काळात शेतीत नवनवीन कल्पनांचा वापर करून आधुनिक शेती केली.त्यांची दानशूर वृत्ती तसेच धार्मिक,अध्यात्मिक गाण्यांची आवड होती.त्यांच्या पार्थिवावर हिवरगाव पावसा येथील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

जयवंताबाई पावसे यांनी आपले कष्टातून शेती फुलवली.मुलांचे शिक्षण केले.बागायती शेती असल्याने घरची परिस्थिती चांगली होती,आर्थिक सुबत्ता होती.१९७२ च्या दुष्काळात वेळ प्रसंगी विडी बांधण्याचे काम केले.मुला,मुलींना उच्च शिक्षण  दिले.त्यांना शिस्त व संस्काराने घडविले.

त्यांचा मुलगा दत्तात्रय पावसे हे इंजिनिअर तर सोमनाथ पावसे हे संगमनेर शहर तालुक्यातील नामांकित वकील आहे.तसेच सिताराम,नामदेव,मधुकर हे प्रगतशील शेतकरी आहेत.पावसे कुटुंबियांच्या शेतामध्ये कोथिंबीर,कांदे,वांगे, टोमॅटो,मका भाजीपाला मोठ्या प्रमाणात घेतला जातो.

कुटुंबाकडे ५० ते ६० गायी आहेत.शेतीला जोड व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात करत आहे.प्रगतशील शेतकरी कुटुंब ओळखले जातात.अशा  धार्मिक,दानशूर,प्रेमळ, सुस्वभावी यांचा जयवंताबाई पावसे अभिष्टचिंतन सोहळा नुकताच त्यांच्या नाती व मुलींनी मोठा उत्साहात साजरा केला. 

जयवंताबाई पावसे यांच्या पश्चात मुले,पुतणे,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांचा दशक्रिया विधी उद्या सोमवार दिनांक ७ जूलै२०२५ रोजी सकाळी ८ वा.हिवरगाव पावसा येथील हनुमान मंदिरासमोरील सभा मंडप येथे होणार आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!