रोटरी क्लब ऑफ कळवणच्या नुतन पदाधिकारी पदग्रहण सोहळा उत्साहात

Cityline Media
0


नानशिक दिनकर गायकवाड रोटरीच्या माध्यमातून आरोग्य, पर्यावरण, शिक्षण क्षेत्रातील कार्यामुळे निश्चितच बंचितांना आधार मिळाला आहे.रोटरी सारख्या सामाजिक संस्थेमुळेच जग पोलिओ मुक्त होण्यासाठी मोठा हातभार लागला आहे. रोटरीने आपलं खाली कार्य करताना समाजातील जास्तीत जास्त नागरिकांना सोबत घेऊन सामाजिक समता प्रस्थापित करावी, असे आवाहन शिव चरित्रकार प्रा.यशवंत गोसावी यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ कळवणच्या नूतन पदाधिकारी पदग्रहण समारंभप्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. गोसावी बोलत होते. व्यासपीठावर माजी प्रांतपाल राजेंद्र भामरे, नगराध्यक्ष कौतिक पगार,तहसीलदार कैलास चावडे, सहप्रांतपाल प्रियंका बागड उपस्थित होते.

 मावळते अध्यक्ष प्रमोद सूर्यवंशी यांनी नूतन अध्यक्ष किरण निखाडे व सेक्रेटरी गणेश पाखले यांच्याकडे पदभार सुपूर्द केला. याप्रसंगी रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० मध्ये आदर्श रोटेरियन पुरस्कार मिळवणारे डॉ. जगताप, इंटरनॅशनल सर्व्हिसेस प्रोजेक्ट चेअरमनपदी निवड झालेले विलास शिरोरे सह प्रांतपालपदी निवड झालेले अरुण पवारयमा सन्मानित करण्यात आले. निर्मला संचेती, स्मिता खैरनार, रमेशशिदे, नितीन संचेती, मनोज भदाणे अंजूम मिर्झा यांनी रोटरी मध्ये प्रवेश केल्याबद्दल गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन रवींद्र बोरसे यांनी केले तर आभार गणेश पाखल यांनी मानले

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. डॉ रवींद्र पगार, बापू कुमावत, निंबा पगार, अविनाश पगार, डॉ. रवींद्र भामरे, राजू मुसळे, निलेश भामरे संभाजी पवार, निलेश दुसाने यांनी परिश्रम घेतले. यावेळी कळवण देवळा, सटाणा व मालेगाव येथील सर्व रोटेरियनस उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!