चाळीसगाव सिटीलाईन न्यूज नेटवर्क विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र,नाशिक यांच्या संकल्पनेतून व पोलीस अधीक्षक जळगाव,तसेच अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव परिमंडळ, उपविभाग पोलीस अधिकारी चाळीसगाव भाग चाळीसगाव यांच्या मार्गदर्शनाने नुकतेच चाळीसगाव शहर पोलीस ठाणे, चाळीसगाव ग्रामिण.पोलिस ठाणे व मेहुनबारे पोलिस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन इमारत तहसील कार्यालय चाळीसगाव येथे गुरुपौर्णिमा महोत्सव समस्त शिक्षक सन्मान हा सोहळा पार पडला.
अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर चाळीसगाव परिमंडळ चाळीसगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत व अध्यक्षतेखाली गुरु पौर्णिमा महोत्सव कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाला चाळीसगाव तालुक्यातील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद असे दोनशे ते अडीचशे शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमात गटशिक्षण अधिकारी,प्राचार्य,मुख्याध्यापक यांच्या सन्मान करण्यात आला.तसेच उपस्थित सर्व शिक्षकांचा देखील गुलाब पुष्प देऊन ऋण व्यक्त करण्यात आलेत.शाळा महाविद्यालय येथे विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना सायबर सुरक्षा ,सोशल मीडिया वापरण्याचे फायदे व नुकसान ,गुड टच बॅड टच वाहतूक नियम आदीबाबत जनजागृती बाबत मार्गदर्शन करण्यात आले.तसेच पोलीस विभागा विषयी देखील माहिती देण्यात आली