नाशिक दिनकर गायकवाड विद्यार्थिनीची फसवणूक, त्यांच्यावर होणारे अत्याचार त्याचप्रमाणे लैंगिक समस्या याविषयी विद्यार्थिनी मध्य जनजागृती व्हावी, यासाठी निनीशा रत्नाकर चुंभळे हिच्याकडून आदिवासी भागात विद्यार्थीिनींना मार्गदर्शन करीत आहे. या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
अन्वया इनिशियेटिव या सामाजिक संस्थेमार्फत निनीशा किशोरवयीन मुलामुलींना मार्गदर्शन करत आहे.सध्या दिंडोरी, पेठ, सुरगाणा, कळवण, त्र्यंबकेश्वर, इगतपूरी या आदिवासी भागात तिचे प्रबोधनपर काम करत आहे. यशोदामाता माध्यमिक विद्यालय गौळाने, दे. ना. पाटील
विद्यालय गंगापूर व ज्युनिअर कॉलेज, ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक माध्यमिक विद्यालय विल्होळी, शासकीय कन्या शाळा जिल्हा परिषद नाशिक, जि.प.शाळा गिरणारे, धोंडेगाव, शास्त्रीनगर, सांप्रदाया पाठशाळा, सिन्नर (मॉट) जि.प.शाळा या सर्व शाळेमध्ये जावून ११५०० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. चुंभळे हिच्या उपक्रमाचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमिषा मित्तल यांनी कौतुक करत प्रोत्साहन दिले आहे.कस्तूरबा गांधी बालिका विद्यालय त्र्यंबक, पेठ,सुरगाणा, मुंडेगाव येथे मार्गदर्शन केले.
उपक्रमाचे मुंढेगावचे श्रीमती कटचारे, त्र्यंबक (पत्र्याचापाडा) येथील श्रीमती आहिरे, पेठच्या श्रीमती भदाणे, सुरगाण्याच्या श्रीमती गांगोडे यांनी निनीशा चुंबळतसचे तिचे पालक माजी जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री रत्नाकर चुंभळे वडील रत्नाकर चुंभळे यांचेही आभार मानले आहे.
