राहुरी प्रतिनिधी अखेर दीर्घ संघर्षानंतर महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठ अंतर्गत प्रकल्पग्रस्तांसाठी विशेष पदभरतीची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
२००७ साली तत्कालीन कृषी मंत्री बाळासाहेब थोरातांनी प्रकल्पग्रस्तांसाठी भरती केली होती.त्यानंतर अनेक वर्षे ही भरती प्रक्रिया रखडलेली होती.
यासंदर्भात नुकतेच मंत्रालयात राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पा.यांच्या उपस्थितीत या भरती प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली,
मात्र सद्य:स्थितीत ही भरती प्रक्रिया राबवताना विद्यापीठाच्या माध्यमातून काही अन्यायकारक आणि जाचक अटी घालून प्रकल्पग्रस्तांना वेठीस धरण्याचा प्रकार दिसून आला. या पार्श्वभूमीवर सर्व प्रकल्पग्रस्तांची सहानुभूतीपूर्वक बाजू मांडत कोणतीही अट न लावता सर्व प्रकल्पग्रस्त उमेदवारांना नोकरीत समाविष्ट करण्यात यावे, अशी ठाम मागणी बैठकीत केली.
या मागणीला मंत्री महोदयांकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला असून, १५ ऑगस्ट २००५ पर्यंत संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत असल्याची माहिती विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी दिली.
