गंगापूर प्नतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी हक्काचा पक्षाचा कार्यकर्ता अत्यंत महत्त्वाचा असतो.याच पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच गंगापूरात बैठक पार पडली.
निवडणूक दरम्यान पक्षाचे धोरण जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि पक्षाची योजना राबविण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांची एकजुटता आवश्यक असते. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेतील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणी करून त्यांना कार्यभार सोपविण्याच्या सूचना गंगापूर तालुक्यातील शेंदुरवादा आणि जामगाव जिल्हा परिषद गटातील व गंगापूर शहरातील शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक बैठकीदरम्यान केली.