मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क ग्रेटर मुंबई बॉडी बिल्डर्स असोसिएशन व मुंबई सबर्बन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशनच्या वतीने अंधेरीतील सेलिब्रेशन क्लब येथे आयोजित करण्यात आलेल्या दुबई येथे झालेल्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेतील पदक विजेत्या शरीरसौष्ठवपटूंचा सत्कार आज युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांच्या हस्ते करण्यात आला.
ह्यावेळी मुंबई सबर्बन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशनचे अध्यक्ष शिवसेना उपनेते अमोल किर्तीकर,आमदार हारून खान,ग्रेटर मुंबई बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष नंदू खानविलकर,मुंबई महानगरपालिका मा.सभागृह नेते शैलेश फणसे, उपविभागप्रमुख राजेश शेट्ये तसेच असोसिएशनचे आणि शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.