मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार. अजित पवार, प्रदेशाध्यक्ष मा.खा सुनील तटकरे तसेच.आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्याच्भोया तालुक्यातील नागनाथ घिसेवाड,बंटी लांडगे यांच्यासह अर्धापूर तालुक्यातील विविध पक्षातील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला.
या सर्व नवीन सहकाऱ्यांचे. अजित पवार पक्षात स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, प्रदेश उपाध्यक्ष. प्रमोद हिंदुराव, प्रदेश सरचिटणीस तथा कोषाध्यक्ष. शिवाजीराव गर्जे.विक्रम काळे, मुख्य प्रवक्ते.आनंद परांजपे, प्रवक्ते संजय तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे,यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.