दिव्यांगांचे अनुदानात अडीच हजार झाल्याने समाधान

Cityline Media
0
मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत राज्यात विविध योजनांच्या माध्यमातून दिव्यांगाना नियमित आर्थिक सहाय्य दिले जाते ते नुकतीच वाढ करुन प्रति महिना अडीच हजार झाल्याने संजय गांधी निराधार योजनांबाबत दिव्यांग जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.
सध्या दिव्यांग लाभार्थ्यांना १५०० इतके अनुदान दिले जात होते. हे अनुदान दरमहा २५०० रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे केली.

या निर्णयामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा २५०० रुपये इतके अर्थसहाय्य मिळणार आहे.प्रहारचे  अध्यक्ष मा.मंत्री यांनी यासाठी आंदोलन उभारले होते त्यांनी दिव्यांगाना प्रति महिना ३००० हजार करा अशी शासनाकडे मागणी लावून धरली होती त्या आंदोलनाचा हा परिणाम असल्याचे बोलले जातेय यामुळे दिव्यागांकडून समाधान व्यक्त होत आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!