नाशिक दिनकर गायकवाड कळवण नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी बाळासाहेब जाधव यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली.येथील नगरपंचायत सभागृहात उपनगराध्यक्षपदाची निवडणूक पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार, कळवण रोहिदास वारुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
विहित मुदतीत उपनगराध्यक्ष पदासाठी बाळासाहेब जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने जाधव यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव यांचा तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
निवडीप्रसंगी नगराध्यक्ष कौतिक पगार, नगरसेवक राहुल पगार, गौरव पगार, तेजस पगार, मोतीराम पवार, मयूर बहिरम, चेतन मैंद, ज्योत्स्ना जाधव, ताराबाई आंबेकर, अजय मालपुरे यांच्यासह बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, शिवस्मारक समितीचे सदस्य भूषण पगार,
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, जयेश पगार, अतुल पगार, राजेंद्र पगार, अविनाश पगार, रोटरीचे अध्यक्ष किरण निखाडे, सुनील गांगुर्डे, दीपक खैरनार, खंडू निकम, दीपक निकम, हरिष जाधव तसेच मुख्याधिकारी नागेश येवले, निवृत्ती कुवर, प्रशासकीय अधिकारी दिलीप ठुबे आदी अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी उपस्थित होते.
