चौफुली रस्त्यावर आमदार हेमंत ओगले यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेला जोडे मारो आंदोलन
श्रीरामपूर दिपक कदम पावसाळी अधिवेशनामध्ये श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांनी टिळक नगर इंडस्ट्रीज बद्दल खोटी माहिती देऊन गैरसमज निर्माण केला आहे त्यामुळे टिळक नगर इंडस्ट्रीजवर कारवाई झाल्यास दोन ते तीन हजार लोकांचे रोजी रोजीचा प्रश्न निर्माण होईल म्हणून त्याच्या निषेधार्थ आमदार हेमंत ओगले यांच्या प्रतीकात्मक फोटोला दत्तनगर टिळक नगर चौफुलीवर जोडमारो आंदोलन करण्यात आले.
त्यावेळी विभागीय जिल्हाप्रमुख भीमराज बागुल जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन तालुका संघटक संजय बोरगे जय भीम आर्मीचे सचिन ब्राह्मणे राजू त्रिभुवन यांनी इशारा दिला की जर विधिमंडळात केलेले तक्रार मागे घेऊन टिळक नगर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ येऊन जाहीर माफी मागावी अन्यथा आमदार हेमंत ओगले यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करून त्यांना गावात फिरवून देणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला त्यावेळी मोठ्या संख्येने महिला पुरुष उपस्थित होते.
