अहिल्यानगर प्रतिनिधी सहकारी बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या आपल्या प्रवरा सहकारी बँकेच्या शाखा विळदघाट शाखेचे उद्घाटन नुकतेच पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा. यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले असून नागरिकांना बँकेशी आर्थिक व्यवहार करण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले.
बँकेची सुवर्ण महोत्सवी वर्षाची यशस्वी वाटचाल सुरू असून तब्बल १ हजार ४०० कोटी रुपयांचा व्यावसायिक टप्पा पूर्ण यशस्वीपणे पूर्ण केला आहे. सभासदांच्या बँकेवर असलेल्या विश्वासाची ही निश्चितच मोठी पावती आहे.
विळदघाट येथील शाखेचा मोठा लाभ अहिल्यानगर येथील व्यवसाय,औद्योगिक क्षेत्र आणि विद्यार्थी वर्गाला होईल,असा विश्वास आहे.
कार्यक्रमास मा आमदार नंदकुमार झावरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनी विखे पा., . वसंतराव कापरे, बँकेचे अध्यक्ष. भास्कराव खर्डे , उपाध्यक्ष.मच्छिंद्र थेटे, पद्मश्रीं डॉ विठ्ठलराव विखे पाटील फौडेशनचे संचालक डॉ. अभिजीत दिवटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
