शिवकालीन १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक स्थळांचा दर्जा दिल्याने मराठी जनतेसाठी अभिमानास्पद बाब-मुख्यमंत्री

Cityline Media
0
मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे नेहमीच वैश्विक होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिल्याने त्यांच्या कार्याचा जागतिकतेला औपचारिक स्वरूपात प्रतिष्ठा लाभली आहे. हा गौरव संपूर्ण देशासाठी आणि मराठी जनतेसाठी अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच केले.
महाराष्ट्र शासनाकडून पाठवण्यात आलेल्या १२ किल्ल्यांच्या नामांकनाला केंद्र शासनाने प्राधान्य दिले आणि युनेस्कोसमोर १२ किल्ल्यांची अधिकृत शिफारस केली. देशभरातून विविध राज्यांनी अनेक स्थळे सुचवली होती,पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांनीच भारताचे प्रतिनिधित्व करावे,यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने पुढाकार घेतला. याकरिता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष आभार मानले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्याने सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या पुढाकारने पु.ल.  देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे कर्तव्यपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते,त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. 

या कार्यक्रमास पंडित हृदयनाथ मंगेशकर,श्रीमती उषा मंगेशकर,  कौशल विकास, नाविन्यता व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा,सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार, आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, कालिदास कोळंबकर,कॅप्टन रवी सेल्वन,प्रसाद लाड,अमित साटम, संजय उपाध्याय, सुनील राणे आदी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!