मृत्यूच्या भीतीने वाल्मीक कराडची कराडची होणार नाशिक रोड कारागृहात रवानगी

Cityline Media
0
बीड सिटीलाईन न्यूज नेटवर्क संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे वाल्मीक कराडला नाशिकरोड कारागृहात हलवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
वाल्मीक कराडला बीडच्या जिल्हा कारागृहा ऐवजी दुसऱ्या कारागृहात पाठवण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांसह संतोष देशमुख कुटुंबियांनी केली होती.बीडच्या जिल्हा कारागृहात गिते गैंग आणि कराड गँगमध्ये वाद झाला होता.आता पुन्हा वाल्मीक कराडच्या जीवाला धोका असल्या कारणास्तव त्याची रवानगी नाशिक रोड कारागृहात करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे आणि महेश केदार हे सर्व आरोपी बीडच्या जिल्हा कारागृहात आहेत. वाल्मीक कराड सध्या बीड जिल्हा कारागृहात असून जिल्हा कारागृहात त्याच्या हालचालीं बाबत संशयास्पद बाबी आढळल्यामुळे त्याला नाशिकरोड कारागृहात हलवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

बीडमध्ये धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असणाऱ्या वाल्मीक कराड याच्यावर यापूर्वी गिते गँग आणि कराड गैंगमध्ये हल्ला झाला होता.पण आता पुन्हा एकदा वाल्मीक कराड आणि अक्षय आठवले टोळीमध्ये वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता वाल्मीक कराडला नाशिकरोड करागृहात हलवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वाल्मीक कराडला बीड हलवण्याच्या हालचालींना वेग आला असल्याचे समजते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!