नाशिक प्रतिनिधी आज नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शहर आणि नाशिक ग्रामिणची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष .खा.सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत नाशिक जिल्ह्यातील पक्षाची सध्याची ताकद, स्थानिक पातळीवरील कार्यरत संघटनात्मक यंत्रणा आणि पक्षाच्या कामकाजाबाबत सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली.
तसेच आगामी निवडणुका लक्षात घेऊन रणनीती ठरवण्यावर आणि जनतेपर्यंत पक्षाचा विचार प्रभावीपणे पोहोचवण्याच्या दृष्टीने सखोल चर्चा करण्यात आली. पक्षाच्या धोरणांवर विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने काम करावे आणि जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेऊन त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अधिक मजबूत होऊन पुढील राजकीय वाटचालीत निर्णायक भूमिका बजावेल,असा ठाम विश्वास या बैठकीच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला.
या बैठकीसाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, मा.खा.समीर भुजबळ, मा. खा.देविदास पिंगळे, मा.आ.पंकज भुजबळ, मा.आ.हिरामण खोसकर, मा.आ.श्रीमती. सरोज अहिरे, युवक प्रदेशाध्यक्ष मा.सूरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी,ओबीसी प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष .प्रशांत कदम, सामाजिक न्याय विभागाचे राज्यप्रमुख. सुनील मगरे, राष्ट्रवादी मोटर मालक कामगार वाहतुक सेलचे राज्यप्रमुख .सचिन जाधव, युवती प्रदेशाध्यक्ष .कु.संध्या सोनवणे, नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष. रविंद्र पगार, नाशिक शहराध्यक्ष . रंजन ठाकरे, नाशिक लोकसभा जिल्हाध्यक्ष . विष्णुपंत म्हैसधुणे, महिला जिल्हाध्यक्ष. श्रीमती. प्रेरणा बलकवडे,युवक शहराध्यक्ष. अंबादास खैरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
