अहिल्यानगर प्रतिनिधी गेल्या सहा वर्षांपासून विळद बाह्यवळण ते सावळी विहीर या नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्ग कामासाठी जनतेची वाट पाहणं सुरू आहे पण काम मात्र सुरू होत नाही! सव्वाशे कोटी रुपयांचा वर्क ऑर्डर मिळाल्यानंतरही प्रत्यक्ष कामाची सुरूवात नाही.म्हणून खासदार निलेश लंके हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहे.
दरवर्षी नवीन तारीख, नवीन घोषण पण त्याच रस्त्यावर ३८८ अपघाती मृत्यू – हे कुणाच्या गळ्यात घालणार असा प्रश्न उपस्थित करत खासदार लंके यांनी ११ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे.यावेळी खासदार लंके म्हणाले की मी खासदार असलो तरी आधी या जनतेचा प्रतिनिधी आहे,आणि लोकांच्या जीवाशी चाललेला खेळ मी गप्प बसून पाहू शकत नाही.अधिकाऱ्यांनी भेट घेतली,असता ते म्हणतात पुन्हा एकदा ‘पावसाळा संपू दे’