पुणे सिटीलाईन न्यूज नेटवर्क मुंबईतील कॅन्टीनमध्ये गरिबांना मारहाण करणारे शिंदे गटाचे आमदार. संजय गायकवाड यांच्या विरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला.ज्या लोकप्रतिनिधींना जनतेने कायदे बनवण्यासाठी विधिमंडळात पाठवले, तेच लोकप्रतिनिधी जर कायदा पायदळी तुडवत असतील तर जनतेचा कायद्यावरील विश्वास उडेल, म्हणूनच अशा मुजोर आमदारावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली.
तसेच, अहिल्यानगर जिल्ह्यात बनावट शासन निर्णय तयार करून ठेकेदार व अधिकाऱ्यांनी शेकडो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला.अशा लोकांवर तातडीने गुन्हा दाखल करावा व कडक कारवाई करावी अशीही मागणी केली. स्वारगेट पोलिस स्थानकाचे निरीक्षक श्री. नांद्रे यांच्याकडे लेखी निवेदन देऊन कायद्याच्या रक्षणासाठी पोलिस प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करावी अशी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.