नियंत्रण सुटल्याने पत्नी गंभीर जखमी
नाशिक दिनकर गायकवाड ब्रेक फेल झाल्याने रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी होऊन रिक्षाचालक जागीच ठार, तर एक महिला जखमी झाली आहे.
याबाबत पोलीस हवालदार सोनीराम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की आसिफ हुसेन शेख (वय ६७) व त्यांची पत्नी शहीपा आसिफ शेख (वय ६०, दोघेही रा. गणेशनगर, नाशिक) असे दोघे जण एमएच १५ झेड ६४३६ या क्रमांकाच्या जुन्या स्क्रॅम झालेल्या
रिक्षाने उमराळे गाव येथून नाशिककडे पेठ रोडने घरी येत होते. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पेठ रोडवर आशेवाडी मनपा कमानीजवळ अचानक रिक्षाचे ब्रेक फेल झाल्याने व पाऊस सुरु असल्याने शेख यांचे रिक्षावरील नियंत्रण सुटले. ही रिक्षा रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. त्यात त्यांची पत्नी शहीपा शेख हिला गंभीर दुखापत झाली असून, रिक्षाचालक आसिफ शेख यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.